गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम कार्यक्रमांतर्गत ५ कि.मी. मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

करियर खेल देश महाराष्ट्र

 

गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम कार्यक्रमांतर्गत ५ कि.मी. मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

सडक अर्जुनी/ गोंदिया 

गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक १३ ते १८ ऑगष्ट २०२५ या कालावधी दरम्यान अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात येत असुन त्या अनुषंगाने श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०६ .०० वा. प्रशासकीय भवन जयस्तंभ चौक गोंदिया येथुन ५ कि.मी. मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली ला मा. श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया व श्री तुषार ढमढेरे, उपवनसरंक्षक सामाजिक वनीकरण यांनी हिरवी झंडी दाखवून मिनी मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात केली .

मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे सुरुवात प्रशासकीय भवन जयस्तंभ चौक गोंदिया येथुन करून मनोहर चौक – फुलचूर नाका – रिलायन्स पेट्रोल पम्प – होप हॉस्पिटल – गौरव फर्निचर – फुलचूर चौक – रामदेव कॉलनी कडे जाणारा रोड – गौरव फर्निचर – होप हॉस्पिटल – रिलायन्स पेट्रोल पम्प- फुलचुर नाका – मनोहर चौक – जयस्तंभ चौक प्रशासकीय भवन, गोंदिया येथे मिनी मॅरेथॉनचा समापन करण्यात आले.

सदर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया ,श्री तुषार ढमढेरे, उपवनसरंक्षक सामाजिक वनीकरण , श्री अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, श्रीमती रोहिणी बानकर , उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया , श्री प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव, श्री विवेक पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी , श्री साहिल झारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा, श्री पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया, श्री श्रीकांत कांबळे, तहसीलदार गोंदिया शहर, श्री समशेर पठाण, तहसीलदार गोंदिया ग्रामीण, श्री दिलीप कौशिक, आर. एफ. ओ, गोंदिया , गोंदिया जिल्ह्याचे सर्व पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलातील ४०० ते ५०० पोलीस अधिकारी व अंमलदार व २०० ते ३०० स्थानिक महिला व पुरुषांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांपैकी पुरुष गट व महिला गट मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या धावकांना पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे यांचे हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले.

याद्वारे नाशामुक्त समाज घडविणेकरिता गोंदिया जिल्हा पोलीस दलाकडून जनजागृती करण्यात आली.

श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया व श्री अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी यांचे मार्दर्शनाखाली श्रीमती रोहिणी बानकर , उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया , श्री प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव, श्री विवेक पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी , श्री साहिल झारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा, श्री पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री नागेश भाष्कर पो नी वाहतूक शाखा, श्री राजेश सरोदे रा पो नी, श्री श्रीकांत हत्तीमारे पो उप नी नक्षल सेल यांनी सदर मिनी मॅरेथॉन चे यशस्वी नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *