आईचा खून करुन बाळाची विक्री करणारी टोळी केली जेरबंद

अपराध महाराष्ट्र शिक्षा

अनोळखी महीलेचा खून करुन मृतदेह खजरी च्या जंगलात फेकणा-या व तिच्या मुलाची विक्री करणा-या अज्ञात

आरोपीस त्याचे साथीदारासह कसलाही सुगावा नसतांना तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनिय माहीतीच्या

आधारे निष्पन्न करुन स्थानिक गुन्हे शाखेने केला गुन्हयाचा उलगडा

आईचा खून करुन बाळाची विक्री करणारी टोळी केली जेरबंद

सडक अर्जुनी= 

दिनांक ०३/०८/२०२५ रोजी ग्राम खजरी शेतशिवारात एक अनोळखी महीला वय अंदाजे २० ते २५ वर्ष हीस कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणाने धारदार शस्त्राने वार करुन जीवानीशी ठार केल्याने इंद्रराज राऊत रा. खजरी, माजी पोलीस पाटील यांचे रिपोर्ट वरुन पोलीस ठाणे डुग्गीपार येथे अपराध क्रमांक ३२३/२०२५ कलम १०३ (१) भारतीय न्याय संहीता चा गुन्हा दाखल करण्यात आला होता व सदर गुन्हयात अनोळखी मृतक महीलेचा व अज्ञात आरोपीचा शोध सुरु होता.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया हे करित असतांना गुन्हयातील अनोळखी मृतक महीलेचा व अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया येथील वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते. गुन्हा घडल्यापासुन ते दिनांक २१/०८/२०२५ रोजी पोलीस पथके मृतक अनोळखी महीलेचा व आरोपीचा शोध घेत असता तांत्रीक विश्लेषण व गोपनीय बातमीनुसार खात्रीशिर माहीती मिळाली की अनोळखी मृतक महीला ही भिलाई छत्तीसगढ येथील रहीवासी आहे. सदर गोपनिय माहीतीवरुन शहनिशा करण्यात आली असता अनोळखी मृतक अन्नु नरेश ठाकुर वय २१ वर्ष रा. भिलाई जि.दुर्ग असल्याचे खात्री झाली.

सदर मृतक महीलेची ओळख पटल्यानंतर तांत्रीक विश्लेषणाचे आधारे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आले असता गुन्हयातील आरोपी अभिषेक सिध्दार्थ तुरकर वय ३६ वर्ष रा. भिलाई जिल्हा दुर्ग छत्तीसगढ, ह.मु. डोंगरुटोला (कवलेवाडा) गोरेगाव जि. गोंदिया हा असल्याचे समजले. सदर आरोपीस आज दिनांक २२/०८/२०२५ रोजी डोंगरुटोला (कवलेवाडा) गोरेगाव येथुन ताब्यात घेण्यात आले असता त्याने सांगीतले की, त्याचे अन्नु नरेश ठाकुर हीचे सोबत अनैतिक प्रेम संबंध होते व तो कर्जात बुडाल्याने त्याला पैश्याची गरज असल्याने त्याने त्याची पत्नी पुनम व बहीण चांदणी रा. नेहरु नगर, भिलाई जि.दुर्ग छत्तीसगढ तसेच गोंदिया येथे राहणारी त्याचे नातेवाईक प्रिया तुरकर यांनी मिळून अन्नु ठाकुर हीचा खुन करुन मृतकच्या मुलगा धनराज वय ७ महीने याचे विक्री करुन पैसे मिळविण्याचा कट रचुन दिनांक ०२/०८/२०२५ रोजी अभिषेक सिध्दार्थ तुरकर यांने अन्नु ठाकुर हीला भिलाई दुर्ग वरुन मोटार सायकलने ग्राम खजरी शेतशिवारात आणुन चाकुने तीच्यावर वार करुन जीवानीशी ठार केल्याची कबुली दिली आहे.

नंतर वरील नमुद चारही आरोपीतांनी संगणमत करुन अन्नु ठाकुर चा मुलगा धनराज वय ७ महीने याचे बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करुन अन्नु ठाकुर चे मुलास आर्थिक फायद्यासाठी १) सुरेखा रमेश चौहान रा. गड्डाटोली, गोंदिया २) प्रिति विकास कडबे रा. कस्तुरबा वार्ड, कचरा मोहल्ला, गोंदिया ३) भावेष अशोक बन्सोड रा. मनोहर कॉलोनी, रामनगर, गोंदिया ४) कमल सुकलाल यादव रा. गड्डाटोली, गोंदिया यांना विक्री केले.

सदर गुन्हयात आज दिनांक २२/०८/२०२५ रोजी आरोपी १) अभिषेक सिध्दार्थ तुरकर २) सौ. पुनम तुरकर दोन्ही रा. नेहरुनगर भिलाई दुर्ग, छत्तीसगड ३) प्रिया तुरकर रा. मुरी गोंदिया ४) सुरेखा रमेश चौहान रा. गड्डाटोली, गोंदिया ५) प्रिति कडबे रा. कचरा मोहल्ला, गोंदिया ६) भावेष अशोक बन्सोड रा. रामनगर,

गोंदिया ७) कमल यादव रा. गड्डाटोली, गोंदिया यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील कायदेशिर कारवाई करीता पो.स्टे. डुग्गीपार यांचे स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया व श्री अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे दिलेले निर्देश सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पुरूषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धिरज राजुरकर, मपोउपनि वनिता सायकर, पो.उप.नि. शरद सैदाने, स.फौ. राजेन्द्र मिश्रा, पो.हवा. सुजित हलमारे, पो.हवा. संजय चव्हाण, पो.हवा. महेश मेहर, पो.हवा. सोमेन्द्रसिग तुरकर, पो. हवा. दिक्षीतकुमार दमाहे, पो.हवा. सुबोधकुमार बिसेन, पो.हवा. प्रकाश गायधने, पो.हवा. इंद्रजित बिसेन, पो.हवा. दुर्गेश तिवारी, पो.हवा. तुलसीदास लुटे, पो.हवा. भुवनलाल देशमुख, पो.हवा. भोजराज बहेकार, पो.हवा. विठ्ठलप्रसाद ठाकरे, पो.हवा. राजकुमार खोटेले, पो.हवा. रियाज शेख, पो.शि. छगन विठ्ठले, पो.शि. हंसराज भांडारकर, पो.शि. संतोष केदार, पो.शि. राकेश इंदुरकर, पो.शि. सुनिल डहाके, पो.शि. राहुल पिंगळे, पो.शि. दुर्गेश पाटील, मपोशि स्मिता तोंडरे, मपोशि कुमुद येरणे, पोशि रोशन येरणे, पोशि योगेश रहिले, पोशि अश्विन वंजारी चापोहवा लक्ष्मण बंजार, चापोशी मुरली पांडे, चापोशी घनश्याम कुंभलवार, चापोशि राम खंडारे तसेच तांत्रिक शाखेचे सपोनि राहुल दुरशेरवार, पोहवा रितेश लिल्हारे, पोहवा रवि शहारे, पोहवा राजु डोंगरे, पोहवा कल्पेश चव्हाण यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *