तंटामुक्त अध्यक्ष पदी अरुण लेदे यांची बिनविरोध निवड
सडक अर्जुनी = तालुकातील ग्राम राजगुडा ग्रामपंचायत इथं
तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी अरुण लेदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या एकमताने व सहमतीने ही निवड पार पडली. गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिकांनी लेदे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अरुण लेदे यांनी गावातील तंटामुक्ती, शांतता व विकासासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचे आश्वासन दिले.
यामुळे गावात एकतेचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काळात वादविवाद सोडविणे व जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी कार्यक्षम नेतृत्व मिळाले आहे.