सौंदड येथील कलाबाई बबनलाल चुऱ्हे यांचे दुःखद निधन.
रमेश चुऱ्हे यांना मातृशोक.
सडकअर्जुनी दि.३.
सौंदड येथील रहिवासी व माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुऱ्हे तसेच पत्रकार भामा चुऱ्हे यांच्या मातोश्री कलाबाई बबनलाल चुऱ्हे,यांचे आज(दि.३.)पहाटे २.३० वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यू समय त्या ९१ वर्षाच्या होत्या.
त्यांच्या मागे पाच मुले,एक मुलगी,स्नुषा,नातवंडे व आप्तस्वकीय असा बराच मोठा परिवार आहे.
आज दुपारी २.०० वाजता स्थानिक स्मशान घाटावर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष सदाशिव वलथरे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य मारवाडे, लिलाधर गहाणे,अनिल मेश्राम, प्रभुदास लोहिया,संजीव बडोले,केवळराम राहिले यांनी यावेळी कलाबाईच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी सौंदड येथील गणमान्य,प्रतिष्ठित, आप्तस्वकीय बहुसंख्येने उपस्थित होते.