03 आरोपी गोंदिया जिल्हयातुन तडीपार डुग्गीपार पोलीसांची कारवाई
पोलीस स्टेशन डुग्गीपार हद्दीतील अवैध दारु विक्रेते इसम नामे 1) आशीष शालीकराम राऊत वय रा. सौंदड 2) भगवान लहु वैदय रा. फुटाळा/सौंदड 3) संदिप अशोक रामटेके रा. पांढरी हे आपल्या घरी अवैधरीत्या देशी/विदेशी दारु बाळगुन दारुविक्रीचा धंदा करीत असल्यामुळे त्यांचेवर पोलीस विभागाने वेळोवेळी धाडी घालुन गुन्हे दाखल केले आहेत. तरीसुध्दा त्यांचेवर कोणताही परीणाम न होता त्यांनी आपला अवैध दारु विक्रीचा धंदा सुरुच ठेवला. त्याअनुषंगाने सुरु असलेल्या गणेश उत्सव, ईद ए मिलाद उत्सवांमध्ये गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणुन अवैध दारु विक्री करणा-या सदर तिन्ही इसमांविरुध्द डुग्गीपार पोलीसांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार करुन मा. उपविभागीय दंडाधिकारी सा. कार्यालय अर्जुनी/मोर येथे सादर केला असता सदर तिन्ही इसमांना 01 महिण्याकरीता गोंदिया जिल्हयातुन तडीपार करण्यात आले.
सदरची कार्यवाही मा. गोरख भामरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री.अभय डोंगरे सा.अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, कॅम्प देवरी, श्री. विवेक पाटील सा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. गणेश कृष्णा वनारे पो.स्टे. डुग्गीपार, स.फौ. विलास निर्वाण, पो.हवा. जगदिश मेश्राम, पो.हवा.प्रल्हाद खोटेले, पो.हवा. आशीष अग्नीहोत्री, पो.ना. संजीव चकोले, पो.ना. महेंद्र सोनवाने, पो.शि. रंजित भांडारकर, पोशि. उदेभान रुखमोडे, चापोशि निखील मेश्राम यांनी केली.