डुग्गीपार पोलीसांनी केले चोरी करणा-या ईसमाला जेरबंद
दिनांक 21/08/2025 रोजीचे 12/55 वा. दरम्यान फिर्यादी नामे खेमराज गंगाराम येवले वय 71 वर्षे रा. डव्वा ता.सडक/अर्जुनी जि.गोंदिया यांच्या डव्वास्थित भुपेश ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकानात एक अनोळखी इसम आला व त्याने फिर्यादीची नजर चुकवून दुकानातील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागीने किं. अंदाजे 67,500/-रु. चा माल चोरून नेल्याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या तपासात यातील आरोपीने वापरलेली मोटार सायकलचा शोध घेवून दिनांक 31/08/2025 रोजी यातील आरोपी नामे मो.अफसर अली सरताज अली वय 42 वर्षे रा.घोलप होटेलच्या मागे बाबा मस्तान शाहा वार्ड, भंडारा यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणण्यात आले व त्याचे ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल व आरोपीने गुन्हयात वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.
सदरची कार्यवाही मा.गोरख भामरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, मा.अभय डोंगरे सा. अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, मा.विवेक पाटील सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री.गणेश वनारे पो.स्टे. डुग्गीपार, सपोनि जावेद शेख, सपोनि रुपाली पवार, पोउपनि प्रेमकुमार शेळके, पोउपनि संजय फाले, पोहवा आनंदराव ईस्कापे, जागेश्वर उईके, आशिष अग्निहोत्री, जगदिश मेश्राम, पोना महेंद्र सोनवाने, पोशि शैलेश झाडे, श्रीकांत मेश्राम, पुरुषोत्तम देशमुख, उद्देभान रुखमोडे यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि प्रेमकुमार शेळके पो.स्टे. डुग्गीपार हे करत आहेत.