नैनपूर/ डूग्गीपार अंगणवाडी सेविकेवर संताप – निलंबनाची मागणी
सडक अर्जुनी= गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम डूग्गीपार गावात अंगणवाडी सेविकेच्या वर्तनावरून संतापाचा भडका उडाला आहे. गावकऱ्यांनी तिच्या तातडीच्या निलंबनाची मागणी केली आहे.
गावकऱ्यांचा आरोप आहे की सेविका महिलांना “तुम्ही भिकारी आहात का?” अशा अवमानकारक शब्दात बोलते. शासन आहार परवडत नाही, अंडी महाग झाली आहेत, अंगणवाडीतील मुले घुगरी खात नाहीत म्हणून मी बनवत नाही, अशी उघडपणे कबुली सेविकेने दिल्याने संताप अधिक वाढला आहे.
अंगणवाडी मदतनीस मात्र जबाबदारी स्वीकारून स्वतःच्या घरून स्वयंपाक करून आणतात, हे पाहून ग्रामस्थ त्यांचा गौरव करत आहेत. याउलट सेविकेचे वेळेवर न येणे, आहाराचे दुर्लक्ष करणे आणि मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, हे गंभीर प्रकार उघड झाले आहेत.
गावकऱ्यांची ठाम मागणी आहे की अशा निष्काळजी सेविकेविरुद्ध प्रशासनाने कठोर पावले उचलून तातडीने निलंबित करावे.