सौंदड उडानपुल रखडला : राजदीप बिल्डकॉम ब्लॅकलिस्ट, पिल्कॉन कंपनीला पुन्हा रिटेंडरिंग – नागरिकांचा संताप

करोबार राजनीति

सौंदड उडानपुल रखडला : राजदीप बिल्डकॉम ब्लॅकलिस्ट, पिल्कॉन कंपनीला पुन्हा रिटेंडरिंग – नागरिकांचा संताप

सौंदड (प्रतिनिधी) :
मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर सौंदड येथे उभारण्यात येणारा उडानपुल हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. अपघातांचा धोका, वाहतूक कोंडी व प्रवाशांचे हाल दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

यापूर्वी हे काम राजदीप बिल्डकॉम कंपनीला देण्यात आले होते. मात्र कामात झालेला प्रचंड विलंब, दर्जाहीन कामाच्या तक्रारी आणि प्रकल्पाची संथ गती पाहता NHAI ने कंपनीला ब्लॅकलिस्ट केले आहे. परिणामी, महत्त्वाकांक्षी उडानपुल प्रकल्प थंडबस्त्यात गेला.

यानंतर NHAI ने पुन्हा रिटेंडरिंगची प्रक्रिया करून पिल्कॉन कंपनीला काम दिले आहे. तथापि, प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार व ते वेळेत पूर्ण होणार का, याबाबत अद्यापही कोणतीही स्पष्टता नाही.
स्थानिक ग्रामवासी
स्थानिक लोकप्रतिनिधींनी NHAI वरच नाराजी व्यक्त करत म्हटले की – “उडानपुलाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत आहे. काम तातडीने सुरू करून वेळेत पूर्ण झाले पाहिजे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू.”

👥 नागरिकांचा संताप
नागरिकांनीही संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले की, “प्रत्येक वर्षी केवळ आश्वासने मिळतात. दररोज अपघातांचा धोका पत्करून प्रवास करावा लागतो. उडानपुलाचे काम तातडीने हवे, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल.”
पिल्कॉन कंपनी Pvt Ltd ब्रीज इंजिनियर
राजेश दालू
डिसेंबर 2024 ला NHAI कडून पिल्कॉन कंपनीला ला सौंदड पुलाचे कामाचे टेंडर मिळाला एक वर्षाचा कार्यकाड आहे रेल्वे पुलाच्या गडार चे काम रायपूर ला सुरू आहे कार्य प्रगती पातावर आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *