मुरदोली वन्यजीव सप्ताहानिमित्त मानव–वन्यजीव सहजीवनाचा संदेश — विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जपणुकीची जाणीव
सडक अर्जुनी (प्रतिनिधी) :
“जंगल वाचवा – जीवन वाचवा” या संदेशाने दुमदुमलेले वातावरण, हिरवाईत भरलेले परिसर आणि विद्यार्थ्यांचा उत्साह — अशा प्रेरणादायी वातावरणात वन्यजीव सप्ताह (1 ते 7 ऑक्टोबर) निमित्ताने मुर्दूली येथे “मानव–वन्यजीव सहजीवन व पर्यावरण जागर” कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना जंगलातील झाडांची प्रजाती, वनस्पतींचे महत्त्व, पशु–पक्ष्यांचे पर्यावरणातील योगदान याबाबत सखोल माहिती देण्यात आली.
पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षण ही आजची गरज असल्याचा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमात जी. ई. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कुऱ्हाडी , रामकृष्ण विद्यालय कुऱ्हाडी , तसेच आधिलोक विद्यालय बोलूंदा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या ज्ञानात भर घातली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वन्यजीव प्रेमी वाय. एम. ध्रुवै यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री क्षेत्र सहाय्यक चंदनबटवे साहेब सामाजिक वनीकरण गोरेगाव,जी. ई. एस. स्कूलचे वी. डी. तांडेकर, आर. आर. भेलावे, के. बी. बघेले, तसेच पत्रकार मुन्नासिंह ठाकूर,उपस्थित होते,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. आर. सोडगीर (वनरक्षक, सा. व. गोरेगाव) यांनी केले. तसेच यांनी विद्यार्थ्यांना “मानव–वन्यजीव सहजीवन” विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले.
तर आरती फुले (वनरक्षक, रोपवाटिका मूरदोली) यांनी विविध झाडांच्या प्रजाती व त्यांच्या पर्यावरणीय भूमिकेची माहिती दिली.
कार्यक्रमास वन कर्मचारी, वनमजूर, शिक्षकवर्ग, तसेच स्थानिक पर्यावरणप्रेमी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे व विद्यार्थी यांनी वनभोजनाचा आस्वाद घेऊन आणि विद्यार्थ्यांनी वनसंवर्धन आणि वन्यजीव रक्षणाचा संकल्प केला.
वन विभागाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयीची जाणीव दृढ होत असल्याचे सर्वमान्य मत व्यक्त करण्यात आले.