नैनपुर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वागणुकीमुळे संताप : महिनाभऱ्या पासून लहान मुले व स्तंनदा माता लाभापासून वंचीत
नैनपूर (ता. सडक /अर्जुनी) ⬤ अंगणवाडीमध्ये ज्यांना अन्न मिळते ते भिकारी आहेत. अश्या शब्दात नैंनपुर येथील अंगणवाडी सेविका पौर्णिमा चुटे यांनी सकस आहार घेणाऱ्या लहान मुले व स्तनदा माताना बोलल्याने, गावातील लहान मुले व महिला गेल्या महिनाभऱ्या पासून अंगणवाडी केंद्रात जाणे बंद केले आहे. ग्रामपंचायतीने ह्या प्रकरणाची माहिती दिली असता, आणि प्रकरणांची चौकशी करतांना CDPO मनोहरजी तांडेकर आणि पर्यवेक्षिका यांनी अहवाल बनवितांना अंगणवाडीत सेविका व मदतनीस यांना दोषी मानले आहे. गरम ताजे अन्न लहान मुले व मातांना देणे अपेक्षित असताना लाभार्थ्यांनाच भिकारी संबोधने योग्य नसल्याने CDPO मनोहरजी तांडेकर यांच्या चौकशीत सिद्ध झाले आहे.
दि. ०४ सप्टेंबरला सेविकेने उन्मत्त पणे वागून एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. चौकशी करतांना गावातील लहान मुले, स्तंनदा माता व CDPO मनोहरजी तांडेकर, पर्यवेक्षक तागडे, सरपंच किरण हटवार आणि अन्य नागरिकांसमोर अंगणवाडीत सेविका व मदतनीस यांच्या करनाम्याची संपूर्ण माहिती देण्यात आली. लाभार्थ्यांना दिला जाणार अन्न योग्य वापर न करता, खराब करून घरच्या बकऱ्याना दिले जाते. इंधनास परवड नाही म्हणून अंडी उखडून न देता कच्चीच दिली जातात. आठवडयात ४ अंडी देणे अपेक्षित असताना एक अंड्याची दोन तुकडे करून ३ दिवस पुरविली जातात. असे लाभार्थ्याचे म्हणणे आहेत. आणि सर्वांची कबूली सेविका व मदतनीस यांनी बोलुन व अधिकाऱ्यासमक्ष लिहून देले आहे. CDPO श्री मनोहरजी तांडेकर, पर्यवेक्षक तागडे यांनी चौकशी अंती सेविका व मदतनीस यांना कसूर/दोषी ठरविले आहे. तरीसुद्धा त्यांचे निलंबन का केलें जात नाही. सेविका व मदतनीस यांना कशाकरीता अभय दिलें आहे. असा सवाल गावकऱ्यासमोर निर्माण झाला आहे.
अंगणवाडी सेविकेचे हे तिसरे वादग्रस्त प्रकरण असल्याचे गावातली नागरिकांनी सांगितले. सन २०२१ वर्षी लहान मुलांचे आंगणवाडीतील ३२ ते ३५ किलो राशन चोरी करताना गावकऱ्यांनी सेविका व मदतनीस यांना रंगेहात पकडले होते. दया याचना केल्यावर त्यावेळचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी मेंढे आणि दुसरे अधिकारी मनोहरजी तांडेकर ह्याच अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकेला मुभा दिली होती. त्यावेळी योग्य कारवाई झाली असती तर पुन्हा हा गैरप्रकार घडला नसता.
CDPO श्री तांडेकर, पर्यवेक्षक तागडे यांच्या समक्ष सेविका व मदतनीस यांनी अभद्र व्यवहार, अन्नाची चोरी, वाटाणा बकऱ्याना चारत असल्याची कबुली केल्यावरही कठोर कार्यवाही करून निलंबन न झाल्याशिवाय गावातील लहान मुले व स्तंनदा व गरोधर माता अंगणवाडी जाणार नाही अशी ताकीद गावकऱ्यांनी दिली होती. आता ह्या घटनेला एक महिना पुर्ण झाला आहे. एक महिन्यापासून लाभार्थी मुले व स्तंनदा आणि गरोदर माता हे सकस आहारा पासून वंचीत आहेत. याची दखल घेऊन CDPO मनोहर जी तांडेकर यांच्या वर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा अशी गावातील नागरीक व महिलांची मागणी आहे.
👉 *“लहान मुलांच्या व स्तनदा, गरोदर मातांच्या हक्कांवर डाका टाकणारी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्वरित निलंबीत करावे अन्यथा आंदोलन करुन अंगणवाडी केंद्राला कुलूप बंद करण्यास येईल” — असा महिलांचा ठाम इशारा.*
*CDPO मनोहर तांडेकर*
अंगणवाडी सेविका. मदतनिश दोषी आहे . अंगणवाडी सेविका नि रागाच्या भरात महिलांना भिकारी बोलले ती त्यांची चूक आहे. एक वेळा माप करून टाकतो. लहान कर्मचारी आहे