सुरगाव चापटीत वाघाचा धुमाकूळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल संताप

अपराध करियर महाराष्ट्र स्वास्थ्य

सुरगाव चापटीत वाघाचा धुमाकूळ

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल संताप

गोंदिया= तालुक्यातील मोरगाव (अर्जुनी) परिसरातील सुरगाव चावटी गावात वाघाच्या सततच्या हालचालींमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाघ दररोज गावात शिरत असून जनावरांवर हल्ले करण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वाघ दिसल्याची माहिती वारंवार वनविभागाला देण्यात आली असली तरी विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांना रात्री शेतावर जाण्यास भीती वाटत असून पशुपालक आपल्या जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी सतत सतर्क आहेत. गावातील लहान मुले व महिलादेखील घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.

गावकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने विशेष पथक पाठविणे, पिंजरा लावणे आणि गस्त वाढविणे या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वाघाचा बंदोबस्त न झाल्यास नागरिकांच्या जीवितासह जनावरांच्या सुरक्षिततेवर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

🖊️ – प्रतिनिधी, एमटीव्ही न्यूज, सडकअर्जुनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *