वन्यजीव व मानव संघर्ष या विषयावर चित्रकला स्पर्धा संपन्न वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव येथे वनविभागाचे आयोजन

करियर देश मनोरंजन महाराष्ट्र शिक्षा

वन्यजीव व मानव संघर्ष या विषयावर चित्रकला स्पर्धा संपन्न

वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव येथे वनविभागाचे आयोजन

सडक अर्जुनी, ता. ४ ऑक्टोबर :
वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव (सडक) येथे आज शनिवार, दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी वनविभागाच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण १५ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

“वन्यजीव व मानव संघर्ष” हा स्पर्धेचा विषय ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून अत्यंत सुंदर व अर्थपूर्ण चित्रे रेखाटून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

या प्रसंगी वनविभागाचे वनक्षेत्राधिकारी, वनरक्षक तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या चित्रांचे अवलोकन करून उत्कृष्ट चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले तसेच सर्व सहभागींचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य श्री. के. के. काशिवार, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
प्राचार्य काशिवार यांनी वनविभागाचे आभार मानत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल विभागाचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *