धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त तक्षशिला बुद्ध विहार राजगुडा सलंगटोला येथे विहार अनावरण सोहळा भव्यदिव्यरित्या संपन्न
सडक अर्जुनी=
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त पंचशील बुद्ध समाज विकास मंडळ राजगुडा आणि बौद्ध उपासक-उपासिका यांच्या संयुक्त विद्यमाने तक्षशिला बुद्ध विहार अनावरण व लोकापर्ण सोहळा अत्यंत श्रद्धा व उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रशांत पडोळे, खासदार भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र होते.
उपाध्यक्ष म्हणून मा. शहासराम कोरोटे, माजी आमदार विधानसभा क्षेत्र तर लोकापर्ण कर्ते मा. मनोहर चंद्रिकापूरे, माजी आमदार मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्र उपस्थित होते.
विशेष उपस्थिती प्रशांत फुलझले. बँक ऑफ बडोदा नागपूर. मोहन सुरसाउत माजीउपसरपंच मंदिटोला. कृष्णा ठलाल. डॉ . डी.एम.सूरसाउत्त . लेखालाल टेकाम उपसरपंच ग्रामपंचायत राजगुडा.हिरालाल डोंगरे.सुलेभन रामटेके सर. मंगेश पंचभाई देवरी.नरेश मेश्राम रोजगार सेवक. विश्वास वैद्य.गौतम मेश्राम.यांची होती.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर सकाळी ९ वाजता फीत कापून दीप प्रज्वलन सोहळा पार पडला. सकाळी १० वाजता संपूर्ण बुद्धवंदना व परिवर्तन पाठ भंते श्रद्धाबोधी यांच्या हस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी परिसरातील बौद्ध बांधव, महिला वर्ग, युवक वर्ग तसेच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन पंचशील बुद्ध समाज विकास मंडळ राजगुडा यांनी केले.