ब्राह्मणी खडकी ग्रामपंचायतीत प्रशासनाचा ठप्प कारभार — तीन महिन्यांपासून ग्रामसेवक गायब!
सरपंच विलास वट्टींचा इशारा — “१५ ऑक्टोंबर ला ग्रामसेवक रुजू न झाल्यास ग्रामपंचायतीला ताला ठोकू”
सडक अर्जुनी= तालुक्यातील ग्राम ब्राह्मणी खडकी येथे
गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामसेवक हजर नसल्याने ब्राह्मणी खडकी ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. नागरिकांच्या अर्ज, प्रमाणपत्रे, पाणीपुरवठा आणि विविध शासकीय योजनांचे काम थांबल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
या परिस्थितीचा तीव्र निषेध करत सरपंच विलास वट्टी यांनी प्रशासनास १५ ऑक्टोबर ला ग्रामसेवक रुजू न झाल्यास ग्रामपंचायत ला ताला ठोकण्याचा इशारा दिला की, “जर ठराविक कालावधीत ग्रामसेवक रुजू झाले नाहीत, तर ग्रामपंचायतीच्या दाराला ताला ठोकला जाईल.”
सरपंच वट्टी यांनी सांगितले की, ग्रामसेवक नसल्याने सामान्य नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. “विकासकामे आणि योजनांचे लाभ गावकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे आम्ही ग्रामस्थांच्या हितासाठी कठोर पावले उचलू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाकडे तातडीने ग्रामसेवक नेमण्याची मागणी केली असून, ग्रामपंचायतीत लवकरच आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे
सरपंच विलास रामदास वटटी ग्रामपंचायत कार्यालय ब्राह्मणी खडकी
तीन महिन्या पासून ग्रामसेवक ग्रामपंचायत ला रुजू झाले नाही. शेतकरी. शाळकरी मुले मुली सरकारी कामे संपूर्ण कोळंबली आहेत उद्या 15 ऑक्टोंबर ला ग्रामसेवक रुजू न झाल्यास मी व ग्रामस्थ ग्रामपंचायत ला टाळा ठोकणार आहे
कॉम्प्युटर ऑपरेटर ज्योती बोरकर तथा ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कार्यालय ब्राह्मणी खडकी
सामान्य फंड. जन्म मृत्यू चे दाखले काडू शकत नाही .15 वित्त आयोगाचे खर्च करू शकत नाही खाते बदल झाले नाहीत. कोणत्याही पद्धतीचा पैसे वेव्हार करू शकत नाही