ब्राह्मणी खडकीत आज भव्य रेकॉर्डिंग डान्स स्पर्धा 🕺💃
सडक अर्जुनी = तालुक्यातील ब्राह्मणी खडकी येथे उद्या दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता भव्य रेकॉर्डिंग डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जय किशान नाट्य कला मंडळ, ब्राह्मणी खडकी यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असून, तो हनुमान देवस्थान सार्वजनिक मंदिराच्या भव्य प्रांगणात पार पडणार आहे.
या स्पर्धेत ग्रुप आणि सिंगल अशा दोन विभागांमध्ये स्पर्धा होणार असून विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे.
🎭 ग्रुप डान्स स्पर्धा मध्ये प्रथम बक्षीस ₹30,000, दुसरे ₹15,000 आणि तिसरे ₹10,000 ठेवण्यात आले आहे.
तर 💃 सिंगल डान्स स्पर्धा साठी प्रथम बक्षीस ₹10,000, दुसरे ₹7,000 आणि तिसरे ₹5,000 असे जाहीर करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. आमदार राजकुमार बडोले (मोरगाव अर्जुनी विधानसभा) उपस्थित राहणार असून, उद्घाटन सरपंच विलास वटी यांच्या शुभहस्ते होणार आहे.
ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
📍 स्थळ: हनुमान देवस्थान सार्वजनिक मंदिर प्रांगण, ब्राह्मणी खडकी
🕢 वेळ: सायंकाळी 7.30 वाजता

