शेंडा येथे बिबट्याने पाडला दोन बकरे व एका शेळीचा फडश्या
पशुपालक इसमाचे 35 हजार रुपयाचे नुकसान
यापूर्वी सुद्धा गावात दोन शेळीचा व कोंबड्यांच घेतला बळी
सडक अर्जुनी :
तालुक्यातील शेंडा, कोयलारी, कोहळीपार,आपकारीटोला, मसरामटोला, उशीखेडा, सालाईटोला परिसरात सध्या बिबट्या धुमाकूळ घालत असून या परिसरातील कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या, तर अनेक शेळी बकऱ्यांचे बळी बिबट्याने घेतले आहे.
याच घटनाक्रमात काल दि.26 ऑक्टोंबर शनिवारच्या मध्यरात्री शेंडा येथील मनोहर भास्कर दिघोरे यांच्या घरच्या गोठ्यात प्रवेश करून पहाटेच्या सुमारास दोन बकरे व एका शेळीचा फडश्या बिबट्याने पाडला आहे.जवळपास त्यांचे 35 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
एकीकडे परतीच्या पावसाने शेतातील धान पिकाचे नुकसान केले.उरलेले धान पिकांचे नुकसान, मावा-तुडतुडा रोग करित आहे.तर दुसरीकडे बिबट्या रोज कुठे ना कुठे शेळ्या,बकरे,कोंबड्या यांच्यावर ताव मारून गोपालक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करत आहे.असे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, पाळीव पशु पालकांचे आर्थिक नुकसान होत असताना,हा बिबट्याचा नुकसानीचा सर्व घटनाक्रम होत असताना वन विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.या सभोवतीच्या परिसरातील जनतेत विशेषत: शेळ्या,बकरे,कोंबड्या व पाळीव प्राणी पालकांच्या मनात याबाबत असंतोष खदखदत आहे.
नुकसानीच्या मानाने फारच अल्प असे आर्थिक सहाय्य वनविभागामार्फत दिल्या जाते.तेही ताबडतोब न देता वर्षांनू वर्षांनी आर्थिक सहाय्य द्यायलाही वन विभागाकडून विलंब लागतो.त्यामुळे नागरिकांच्या मनात आणखीनच संतापाची भावना पसरली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने बीट व वनरक्षक आशा रहेले यांनी वन विभागाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावून देण्यात यावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
तर शेंडा येथील संतप्त ग्रामवाशियांनी सापळा लावून गेल्या काही महिन्यापासून त्रास देणाऱ्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांचे,पशुपालकांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा.
शेंडा परिसरातील मानव वन्यजीव संघर्षाची वाट तर वन विभाग पहात नाही ना? असा प्रश्नही संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे…
एकूणच वन विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण झाला असून,जीवाच्या आकांताने स्वतःच्या जीवाची स्वतः सुरक्षितता करायची याशिवाय दुसरा पर्याय आमच्यासमोर नाही असे या परिसरातील गावकरी म्हणत आहेत.
वन विभागाने कुठल्याही अप्रिय घटनांची वाट न पाहता सापळी लावून,या बिबट्यांचा बंदोबस्त करावा.अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे.वन विभाग याबाबत काय पावले उचलतो? याकडे या परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

