विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत आश्रमशाळा कोयलारीच्या अश्विताचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
गोंदिया = – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १६ ते १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पायलट आर्चरी सेंटर, गडचिरोली येथे विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विभागातील विविध शाळांचे धनुर्धर सहभागी झाले होते.
या स्पर्धेत **शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, कोयलारी** येथील **१२ धनुर्धरांनी* *गोंदिया जिल्हा स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक पटकविलेला*. यातील **१९ वर्ष वयोगटातील मुलींच्या इंडियन राऊंड** प्रकारात **अश्विता गणेश धूर्वे** हिने **चतुर्थ क्रमांक** पटकावला. या यशामुळे तिने **नागपूर विभागीय संघात** स्थान मिळवले असून, **नोव्हेंबर २०२५ मध्ये वाशिम येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत** ती **नागपूर विभागाचे नेतृत्व** करणार आहे.
अश्विताच्या या यशाबद्दल **एकात्मिक आदिवासी प्रकल्प, देवरी** चे प्रकल्प अधिकारी **श्री. उमेश काशिद**, क्रीडा समन्वयक **श्री. दीपेश मांडे**, मुख्याध्यापक **श्री. सदानंद भुरे**, धनुर्विद्या प्रशिक्षक **श्री. रविकुमार रंगारी** तसेच समस्त शिक्षक, कर्मचारी व पालकवर्ग यांनी हृदयपूर्वक **अभिनंदन** केले. सर्वांनी तिच्या पुढील यशासाठी **शुभेच्छा** दिल्या.
“अश्विताच्या यशाने आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणवत्तेची झलक दिसली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही ती उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास आहे.
श्री. उमेश काशिद, प्रकल्प अधिकारी
प्रकल्प कार्यालयाने “एक आश्रमशाळा एक क्रीडा प्रकार” या अंतर्गत कोयलारी येथे आर्चरी, जमाकुडो येथे कुस्ती तसेच भविष्यात इतरही आश्रमशाळेत वेगवेगळे क्रीडा प्रकार सुरु करण्याचे नियोजले आहे. कोयलारी आश्रमशाळेच्या या यशाने जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीला बळ मिळाले आहे. अश्विताच्या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

