सडक अर्जुनी शहरातील सेतू केंद्रात नागरिकांची दररोज पायपीट; दुसऱ्या सेतू केंद्राची मागणी जोरात
सडक अर्जुनी (ता. गोंदिया) – शहरातील एकमेव सेतू केंद्रात कामकाजासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पहाटेपासूनच रांगा लागतात, तर नंबर मिळवण्यासाठी काही नागरिकांना रात्रीपासूनच केंद्राबाहेर थांबावे लागते. त्यामुळे जनतेचा संताप वाढला असून दुसरे सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सडक अर्जुनी हा तालुका असून, या सेतू केंद्रावर तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींचे नागरिक शासकीय कामकाजासाठी येतात. वाढती लोकसंख्या आणि सेतू केंद्रातील मर्यादित यंत्रणा यामुळे नागरिकांना दिवसभर रांगेत थांबावे लागते. अनेक वेळा वृद्ध, महिला व विद्यार्थ्यांना यातून मोठा त्रास सहन करावा लागतो.
स्थानिक नागरिक हंसराज कठाने यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांनी सडक अर्जुनी शहरात दुसरे सेतू केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी सांगितले की, “नागरिकांच्या सोयीसाठी आणखी एक सेतू केंद्र सुरू झाल्यास पायपीट आणि गर्दीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल.”
दरम्यान, नागरिकांचे म्हणणे आहे की प्रशासनाने या मागणीची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे

