150 वी सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘ डूग्गीपार पोलिसांकडून Run for Unity’ कार्यक्रमाचे आयोजन
सडक अर्जुनी (प्रतिनिधी):
लोखंडपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकात्मतेचा संदेश देण्यासाठी “Run for Unity” कार्यक्रमाचे आयोजन पोलीस स्टेशन डुग्गीपार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता शेंडा चौक, सडक/अर्जुनी येथून सुरू होणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश देशातील ऐक्य, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे हा असून, सडक/अर्जुनी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या धाव उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस स्टेशन डुग्गीपारचे ठाणेदार श्री. गणेश वणारे यांनी केले आहे.

