देवरीत नागरिक त्रस्त! विजेचा लपंडाव दूर करण्यासाठी हेल्पिंग ग्रुपचा आवाज— महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
देवरी (प्रतिनिधी):
देवरी तालुक्यातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडितीचा सामना करावा लागत आहे. कमी व्होल्टेज, वारंवार वीज जाणे आणि विद्युत उपकरणांचे होणारे नुकसान या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या पार्श्वभूमीवर हेल्पिंग ग्रुप, देवरी तर्फे महावितरण कार्यालयाकडे लोडजवळ (लोडशेडिंग) दूर करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले.
ग्राहकांना न विचारता. कोणतीही सहमती न घेता. ग्राहकांचे जुने चालू मीटर काढून. जास्त फिरणारे स्मार्ट मीटर लावण्यात आले आहे त्या मुळे जनतेमध्ये महावितरण बद्दल रोष पहायला दिसत आहे
स्मार्ट मीटर चे बिल ग्राहकांना खूप जास्त येत अशक्यामूडे ग्राहक चिंतेत आला आहे. महावितरण च्या लापरवाहीमूड जनतेला त्रास सहन करावा लागत आहे
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. कमी व्होल्टेजमुळे फ्रीज, मोटर, टीव्ही, पंखे यांसारखी उपकरणे निकामी होत आहेत. तसेच वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे गरीब व लहान व्यावसायिकांचे आर्थिक नुकसानही होत असल्याचे ग्रुपने निदर्शनास आणले आहे.
नागरिकांना नियमित व स्थिर वीजपुरवठा मिळावा म्हणून विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर मोहम्मद इलयाज कुरेशी, सचिन भांडारकर, संदीप नामदेवार, श्रीकांत कोरेटी, अजय अग्रवाल, त्रिलेश साहू आणि जय साखरे . यांच्या स्वाक्षऱ्या असून, महावितरण कार्यालयाने हे निवेदन ३० ऑक्टोबर २०२५ रोजी स्वीकारले आहे.

