रेंगेपार–दल्ली–ब्राह्मणी–डोंगरगाव डिपो परिसरातून रेतीचा अवैध उपसा सुरूच!
वनविभाग मूकदर्शक, रात्रभर सुरू रेतीची लूट
सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार, दल्ली, ब्राह्मणी व डोंगरगाव डिपो परिसरातून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. वनविभागाच्या हद्दीतून दररोज रात्री रेती वाहतूक निर्भयपणे सुरू असून, विभागीय अधिकारी व कर्मचारी मात्र मौन बाळगून आहेत.
स्थानिकांच्या मते, वनपाल व वनरक्षक रेती चोरीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. रेतीने भरलेले ट्रॅक्टर जंगलमार्गाने खुलेआम धावताना दिसतात, तरीही कारवाई होत नाही.
थंडीचे दिवस सुरू होताच रेती चोरीला वेग आला असून, शासनाच्या महसूलाला मोठा फटका बसत आहे.
या प्रकारामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

