मांडोबाई-मुंडीपार रोडवर ॲम्बुलन्सला लागली भीषण आग — सुदैवाने जीवितहानी नाही
मांडोबाई : आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास अंदाजे दोनच्या दरम्यान मांडोबाई ते मुंडीपार मार्गावर धावणाऱ्या एका ॲम्बुलन्सला अचानक भीषण आग लागली. आगीमुळे ॲम्बुलन्स पूर्णतः जळून खाक झाली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत अग्निशामक विभागास संपर्क साधला. दरम्यान, आग कशामुळे लागली याचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. मात्र वाहनाच्या देखभालीतील शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षाचे हे जिवंत उदाहरण असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे व वातावरण निर्माण झाले असून, संबंधित विभागाने तपास करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

