खाजगी शाळेतील 52 वर्षीय मुख्याध्यापकाकडून शिकवणीच्या नावाखाली अल्पवयीन विद्यार्थ्यांनींशी अश्लील चाळे
डूगगीपार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल तर आरोपी जेलमध्ये रवाना
सडक अर्जुनी=
जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात येत असलेल्या घाटबोरी/ कोहळी येथील खाजगी शाळा येथे कार्यरत मुख्याध्यापक कामेद दामोदर कापगते 52वर्ष राहणार मुंगली /नवेगाव बांध यांनी मुलींची शिकविण्याच्या नावाखाली शरीराच्या लज्जास्पद भागात हात लावून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आल्याने शालेय विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
काही महिन्या अगोदर आणखी एका खाजगी शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीची अश्लील चाळे केल्याची शाही वाळत नाही तर आणखी हा एक प्रकार घडल्याने गुरुजींना झालं तरी काय असा प्रश्न आता सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.
आई-वडिलांनंतर गुरुजीला गुरुचे स्थान असून आता गुरुजी हा गुरुजी राहिला नसून प्रेमाचे धडे देणारा गुरु असल्याचे प्रकारावरून दिसून येतो.तालुक्यातील घाटबोरी/ कोहळी येथे एका खाजगी संस्थेकडून आठ ते दहावी पर्यंतची शाळा असून ह्या शाळेत कार्यरत असलेला मुख्याध्यापक हा मुलींची शिकवणीच्या नावाखाली अश्लील चाळे करत असल्याची काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्याने ही बाब शालेय विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना सांगितली त्यामुळे ही बाब उजेडात आली. याबाबत शालेय समिती कडून डुग्गीपार येथे गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी अटक झालेला आहे.ह्या आरोपी ला बाल संरक्षण कायदा अन्वेय व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गणेश वनारे करत आहेत.

