श्रीरामनगर वासीयांचे जंगलात दुसऱ्यादिवशी मुक्काम वन्यप्राण्यांचा मोठा धोका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही

अपराध करियर महाराष्ट्र

श्रीरामनगर वासीयांचे जंगलात दुसऱ्यादिवशी मुक्काम
वन्यप्राण्यांचा मोठा धोका
प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही
सडक अर्जुनी=  तालुक्यातील
श्रीरामनगर येथील पुनर्वसित नागरिकांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात मोठा निर्धार करत ४ डिसेंबर २०२५ रोजी कालीमाती, कवलेवाडा, झलकर्गोंदी या मूळ गावी परत जाऊन शेती सुरू करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. पुनर्वसनाला तब्बल १३ वर्षे पूर्ण झाली, पण गावकऱ्यांच्या सुमारे १६ मूलभूत मागण्या आजतागायत अपूर्णच राहिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदारांपर्यंत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागण्यांची माहिती देत वारंवार पाठपुरावा केला. मात्र शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नसल्यामुळे आता गावकऱ्यांनी “शासनाने दिशा भूल केली, आता आम्हीच ठाम भूमिका घेणार!” असा जोरदार पवित्रा घेतला आहे.

गावकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे—
“आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर ठीक, अन्यथा आम्ही ४ डिसेंबरला मूळ गावी परत जाऊन शेती करू! शासन कितीही हवेत बसून निर्णय घेत असो, आमचे जीवन मात्र अडचणीत आहे.”

२०१२ साली झालेले पुनर्वसन, त्यानंतरची १३ वर्षे आणि न पूर्ण झालेल्या मागण्यांमुळे आता गावकरी मोठे पाऊल उचलून जंगलात सुट्ट्या लहान मुला बाळा सहित स्व गावी पोहोचले आहेत. शासनाने त्वरित हस्तक्षेप करून श्रीरामनगरवासीयांच्या मागण्यांची पूर्तता करावी, अशी एकमुखी मागणी करण्यात येत आहे.
*बातमी संकलन : चंद्रमुनी बनसोड गोंदिया*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *