नवोदय परीक्षा केंद्रांवर गैरव्यवहार!
सडक अर्जुनीतील पाचही केंद्रांवर ‘कॉपीकरण’चे सावट; पालकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सडक अर्जुनी तालुक्यातील नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केल्या आहेत. तालुक्यातील पाचही परीक्षा केंद्रांवर शिक्षकांकडून गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
तक्रारीनुसार —
▪️ काही शिक्षक परीक्षा हॉलमधील टेबल हलवून विद्यार्थ्यांना संकेत देतात,
▪️ काही शिक्षक विद्यार्थ्यांचे पेपर तपासतात,
▪️ तर काहीजण विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचा मौल्यवान वेळ वाया घालवतात.
या सर्व घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा पालकवर्गाचा आरोप आहे. त्यामुळे १३ डिसेंबरला होणाऱ्या नवोदय विद्यालय परीक्षेत सडक अर्जुनी तालुक्यातील कोणत्याही केंद्रावर शिक्षकांकडून तक्रार आढळल्यास त्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
पालकांच्या या निवेदनामुळे प्रशासनावर कारवाईची जबाबदारी वाढली असून परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
—

