केंद्र स्तरीय क्रीडा महोत्सव ब्राह्मणी खडकीत सुरू
अटल जिल्हा क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहपूर्ण सुरुवात
ब्राम्हणी खडकी :
अटल जिल्हा क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाला आजपासून ब्राह्मणी खडकी येथे उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे. दि. 9, 10 ते 11 डिसेंबर 2025 या कालावधीत हा भव्य क्रीडा महोत्सव पार पडणार असून जिल्ह्यातील स्पर्धक खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
स्पर्धांचे आयोजन जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ब्राह्मणी खडकी येथील क्रीडांगणावर करण्यात आले असून विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा रंगणार आहेत.
स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये या महोत्सवाबद्दल मोठ्या प्रमाणात उत्सुकता पाहायला मिळत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रग्रहणाताई डोंगरवार सदस्य गोंदिया दिपाली मेश्राम पंचायत समिती सदस्य अल्लाउद्दीन राजानी पंचायत समिती सदस्य .विलास वट्टी सरपंच बामणी खडकी.लेकचंद शेंडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती. व सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी तंटामुक्त समिती सदस्य पदाधिकारी .महिला बचत गट संपूर्ण सदस्य पदाधिकारी .संपूर्ण ब्राह्मणी ग्रामवासी पालक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी व आजी-माजी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजन केले आहे तरी पण पालक वर्गणी व ग्रामस्थांनी आपली उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे अशी शाळा समितीतर्फे विनंती करण्यात येतात

