सडक अर्जुनी तालुक्यात नवोदय परीक्षा आज 11.30 वाजता सुरू
सडक अर्जुनी : नवोदय जवाहर विद्यालयाची प्रवेश परीक्षा आज सकाळी 11.30 वाजता सुरू होणार आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदडा जिल्हा परिषद, लोहिया विद्यालय सडक अर्जुनी, जिल्हा परिषद खजरी व पांढरी या पाचही परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे.
परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार अथवा चॅटिंग होऊ नये, अशी ठाम मागणी पालकांनी केली आहे. मागील अनुभव लक्षात घेता सर्व केंद्रांवर कडक देखरेख ठेवावी, तसेच पर्यवेक्षकांनी काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा पालकवर्गातून व्यक्त होत आहे.
परीक्षा शांततेत, पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.

