ब्राम्हणी खडकी गावाला ‘टी.बी. मुक्त गाव’ म्हणून गांधी प्रतिमा घेऊन गौरव
सडक अर्जुनी | प्रतिनिधी
शासनाच्या ‘टी.बी. मुक्त पंचायत’ उपक्रमांतर्गत ब्राम्हणी खडकी गावाला ‘टी.बी. मुक्त गाव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. देहू येथील गांधी प्रतिमा परिसरात आयोजित कार्यक्रमात गावाचा सन्मान करण्यात आला. ही माहिती सरपंच विलास वट्टी यांनी दिली.
ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून क्षयरोग निर्मूलनासाठी प्रभावी काम करण्यात आले. वेळेवर रुग्ण शोध, उपचार पूर्ण करणे, जनजागृती व पाठपुरावा यामुळे गावाने टी.बी. मुक्तीचे उद्दिष्ट साध्य केले.
या यशाबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे

