संविधान दिनानिमित्त खडकी ग्रामपंचायतीत भव्य आरोग्य शिबिर, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सडक अर्जुनी=
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत खडकी ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरास गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.
या कार्यक्रमास सरपंच शर्मिला चिमणकर, उपसरपंच हेमराज दखणे, ग्रामपंचायत सचिव कु. विद्या कांबळे यांच्यासह छाया कुलभजे, प्रमिला कुसराम, पुरुषोत्तम मेश्राम, वनिता गोटेफोडे, सीमा ब्राह्मणकर, दुलेश गोटेफोडे, देवेंद्र मेश्राम, प्रकाश वैरागडे उपस्थित होते.
शिबिरात डॉक्टर व नर्स यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.
संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आरोग्याबाबत जनजागृती निर्माण झाली असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

