शशीकरण नदी परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन जनतेत भीतीचे वातावरण

अपराध राजनीति स्वास्थ्य

शशीकरण नदी परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन
जनतेत भीतीचे वातावरण

सडक अर्जुनी= शशीकरण नदीच्या काठालगतच्या परिसरात सलग काही दिवसांपासून दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी, गुराखी व नदीकाठाने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी बिबट्याचे ठसे व हालचाली पाहिल्याची माहिती दिली आहे.

सदर प्रकारामुळे शेतात कामासाठी जाणे तसेच लहान मुलांची ये-जा धोकादायक ठरत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वनविभागाने तातडीने पाहणी करून पिंजरा लावणे, गस्त वाढवणे व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्याची मागणी होत आहे.

नागरिकांनी रात्री व एकट्याने बाहेर पडणे टाळावे, गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत व संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *