सडक अर्जुनी येथे पत्रकार कार्यालयाचे भव्य उद्घाटन
सावित्रीबाई फुले जयंती साजरी
सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष पदी चंद्रमुनी बनसोड सचिव पदी मुन्नासिंह ठाकूर यांची निवड
सडक अर्जुनी —
दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सडक अर्जुनी येथे पत्रकार कार्यालयाचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून. फीत कापुण उद्घाटन करण्यात आले आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री सतीश केसरकर हे होते प्रमुख उपस्थितीत अभिषेक पवार (मोरगाव अर्जुनी), ओमप्रकाश सोलकंखी, विनोद शहारे, बाबुलाल नेवारे, युवा उद्योजक नितेश बोरकर, चव्हाण सर (शेंडा), निलेश शहारे व हेमू वालदे . सचिन फुंडे.कुलदीप तागडे.यांची मान्यवर म्हणून उपस्थिती होती आहे.
याच वेळी आमचे लाडके मोठे भाऊ चंद्रमुनी बनसोड यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रम सामाजिक प्रबोधन व पत्रकारितेच्या मूल्यांचा संदेश देणारा ठरणार ठरला
कार्यक्रमात सडक अर्जुनी येते मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष पदी चंद्रमुनी बनसोड यांची निवड करण्यात आली. सचिव पदी मुन्नासिंह ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली
कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुन्नासिंह ठाकूर यांनी केले आभार प्रदर्शन चव्हाण सर यांनी मानले

