खडकी गावात तणावपूर्ण वातावरण; ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन
खडकी (ता. सडक अर्जुनी) येथील पळसबाग ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खडकी गावात आज मंगळवार, दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर काही ग्रामस्थांनी आंदोलन केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींना दूरध्वनीद्वारे देण्यात आली.
आंदोलनादरम्यान परिसरात तणावपूर्ण पण शांत वातावरण पाहायला मिळाले. मात्र, या आंदोलनामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. ग्रामपंचायत कार्यालय खडकी येथे कोणत्याही अनुचित प्रकारास आळा बसावा यासाठी देवरी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनाच्या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. परिस्थिती नियंत्रणात असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास व माहितीची प्रतीक्षा आहे.

