खडकी–डोंगरगावात सागवान तस्करीचा धुमाकूळ!<ठेकेदाराचा साथीदार कोण..? ट्रॅक्टरने मौल्यवान सागवान लंपास >सडक अर्जुनी = तालुक्यातील खडकी–डोंगरगाव परिसरात मौल्यवान सागवानाची खुलेआम तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक ठेकेदाराने जंगलातून सागवान कापून कर्मचारी यांच्या मदतीने सागवानाची तोड करून स्वतःच्या ट्रॅक्टरने आपल्या खसाऱ्यात मिक्स केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.ही बाब लक्षात येऊनही वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याने संशय अधिक गडद झाला आहे. जंगलाचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच कर्मचारी सागवान तस्करीला खतपाणी घालत असतील तर जंगल सुरक्षित आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.तालुक्यात सागवान चोरीचे प्रकार वाढत असताना कारवाई केवळ कागदावरच होत असल्याचे चित्र आहे. वनविभागातील भ्रष्ट साखळीमुळेच तस्कर निर्भयपणे जंगल साफ करत असल्याचा आरोप आता उघडपणे केला जात आहे.प्रकरणात संबंधित ठेकेदार, कर्मचारी, ट्रॅक्टर मालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनि चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.ट्रॅक्टर फोटो व्हिडिओ एपिसोड 02 मध्ये दाखवण्यात येहिल

