बामणी-खडकी येथे मानवधर्माचे वार्षिक सेवक संमेलन व एकतेचे जनरल हवन 14 फारवरी ला

करियर महाराष्ट्र स्वास्थ्य

बामणी-खडकी येथे मानवधर्माचे वार्षिक सेवक संमेलन व एकतेचे जनरल हवन 14 फारवरी ला

बामणी-खडकी (ता. सडक अर्जुनी) :
महानत्यागी बाबा जुमदेवजी मानवधर्म उगमस्थान टिमकी, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मानवधर्माच्या विचारांचा प्रचार-प्रसार व समाजात एकतेचा संदेश देण्यासाठी मानवधर्माचे वार्षिक सेवक संमेलन व एकतेचे जनरल हवन कार्य दिनांक शनिवार 14 फेब्रुवारी 2026 रोजी ग्राम बाम्हणी-खडकी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात भक्तिमय व शिस्तबद्ध वातावरणात होणार आहे 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य परमात्मा एक सेवक श्री रमेशभाऊ ठुब्रीकर (नागपूर) . कार्यक्रमाचे उपाध्यक्ष सुनील ढोबळे, उद्घाटक सुनील, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगराज खेडकर यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाचे आयोजन केवळ राम डोये,प्रमोद मटाले, देवानंद हतीमारे व परिसरातील मानवधर्म सेवकांच्या वतीने करण्यात करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 6 ते 7.30 वाजता सामूहिक हवनकार्याने सुरवात होणार आहे. हे हवनकार्य किशोर तरोणे, बामणी यांच्या निवासस्थानी विधीवत पार पाडण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 8.15 ते 11.30 वाजेपर्यंत हवनकार्य व सेवकांची चर्चा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत मानवधर्माच्या तत्वज्ञानावर, सेवकांची भूमिका, सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती, नैतिक मूल्यांची जोपासना व मानवतेच्या सेवेसंदर्भात सखोल चर्चा करण्यात येहिल.
सकाळी 11.30 ते 12.30 वाजेदरम्यान स्वागत समारंभ पार पडेल. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येहिल. त्यानंतर एका भगवंताचे चर्चासत्र व मार्गदर्शन कार्यक्रम दुपारी 12.30 ते 4 वाजेपर्यंत होणार आहे.अध्यक्षीय मार्गदर्शनात श्री रमेशभाऊ ठुब्रीकर हे असणार आहेत.मानवधर्माचा मूळ उद्देश स्पष्ट करताना “मानवधर्म म्हणजे कोणत्याही जाती-धर्मापेक्षा श्रेष्ठ असा मानवतेचा धर्म असून एकाच भगवंतावर श्रद्धा ठेवून समाजात प्रेम, एकता व सद्भावना निर्माण करणे हाच त्याचा खरा अर्थ आहे” 
कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी व्यसनमुक्त समाज, सुसंस्कारित पिढी घडविणे, सामाजिक अन्यायाविरुद्ध अहिंसक मार्गाने लढा देणे व सेवकांनी गावागावात मानवधर्माचा संदेश पोहोचवावा,
कार्यक्रमाच्या शेवटी तीर्थप्रसाद व सामूहिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.संमेलनाला परिसरातील सेवक-सेविका, युवक-युवती, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून कार्यक्रम यशस्वी करावा. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल किशोर तरोणे यांनी सर्व  सेवक सेविका यांना विनंती केली आहे की वरील कार्यकमय उपस्थिती राहून कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तन-बंधनाने सहकार्य करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *