वडेगाव (हत्तीमारे टोला) येथे अज्ञातांकडून शेतकऱ्याचे धानाचे पुंजणे जाळले लाखो रुपयांचे नुकसान; भरपाईची मागणी

वडेगाव (हत्तीमारे टोला) येथे अज्ञातांकडून शेतकऱ्याचे धानाचे पुंजणे जाळले लाखो रुपयांचे नुकसान; भरपाईची मागणी सडक अर्जुनी = तालुक्यातील ग्राम वडेगाव (हत्तीमारे टोला) येथे अज्ञात व्यक्तींनी शेतकऱ्याचे पाच अकराचे धानाचे पुंजणे जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, ग्राम वडेगाव येथील शेतकरी हरिचंद इसतारी चूटे (रा. हत्तीमारे टोला, […]

Continue Reading

शशीकरण नदी परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन जनतेत भीतीचे वातावरण

शशीकरण नदी परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन जनतेत भीतीचे वातावरण सडक अर्जुनी= शशीकरण नदीच्या काठालगतच्या परिसरात सलग काही दिवसांपासून दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी, गुराखी व नदीकाठाने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी बिबट्याचे ठसे व हालचाली पाहिल्याची माहिती दिली आहे. सदर प्रकारामुळे शेतात कामासाठी जाणे तसेच लहान मुलांची ये-जा धोकादायक ठरत असल्याची […]

Continue Reading

गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष ग्रामस्थांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; आंदोलनाचा इशारा

गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष ग्रामस्थांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; आंदोलनाचा इशारा सडक अर्जुनी (प्रतिनिधी):कोसमतोंडी परिसरातील मुरपार लेडेझरी येथील ग्रामपंचायत कायलंय मधें मूलभूत नागरी सुविधांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्य यांनी केला आहे. गावातील विहिरींची दुरुस्ती न होणे, विहिरीतील गाळ वेळेवर न काढणे, तसेच शौचालयांची दुरवस्था यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा […]

Continue Reading

सडक अर्जुनी तालुक्यात  नवोदय परीक्षा आज 11.30 वाजता सुरू

सडक अर्जुनी तालुक्यात  नवोदय परीक्षा आज 11.30 वाजता सुरू सडक अर्जुनी : नवोदय जवाहर विद्यालयाची प्रवेश परीक्षा आज सकाळी 11.30 वाजता सुरू होणार आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदडा जिल्हा परिषद, लोहिया विद्यालय सडक अर्जुनी, जिल्हा परिषद खजरी व पांढरी या पाचही परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार अथवा […]

Continue Reading

सडक अर्जुनी नगरपंचायतचा संताजी जगनाडे महाराज जयंती विसर – चौकशी व शिस्तभंग कारवाईची मागणी

सडक अर्जुनी नगरपंचायतचा संताजी जगनाडे महाराज जयंती विसर तेली समाजाची प्रशासनाविरोधात नाराजी – चौकशी व शिस्तभंग कारवाईची मागणी सडक अर्जुनी : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत १८ फेब्रुवारी २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात थोर राष्ट्रपुरुष व संत महापुरुष यांच्या जयंती साजरी करणे बंधनकारक आहे. यानुसार ८ डिसेंबर रोजी संत संताजी […]

Continue Reading

नवोदय परीक्षा केंद्रांवर गैरव्यवहार! सडक अर्जुनीतील पाचही केंद्रांवर ‘कॉपीकरण’चे सावट; पालकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नवोदय परीक्षा केंद्रांवर गैरव्यवहार! सडक अर्जुनीतील पाचही केंद्रांवर ‘कॉपीकरण’चे सावट; पालकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सडक अर्जुनी तालुक्यातील नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केल्या आहेत. तालुक्यातील पाचही परीक्षा केंद्रांवर शिक्षकांकडून गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तक्रारीनुसार — ▪️ काही शिक्षक परीक्षा हॉलमधील टेबल हलवून विद्यार्थ्यांना संकेत देतात, […]

Continue Reading

श्रीरामनगर वासीयांचे जंगलात दुसऱ्यादिवशी मुक्काम वन्यप्राण्यांचा मोठा धोका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही

श्रीरामनगर वासीयांचे जंगलात दुसऱ्यादिवशी मुक्काम वन्यप्राण्यांचा मोठा धोका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही सडक अर्जुनी=  तालुक्यातील श्रीरामनगर येथील पुनर्वसित नागरिकांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात मोठा निर्धार करत ४ डिसेंबर २०२५ रोजी कालीमाती, कवलेवाडा, झलकर्गोंदी या मूळ गावी परत जाऊन शेती सुरू करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. पुनर्वसनाला तब्बल १३ वर्षे पूर्ण झाली, पण गावकऱ्यांच्या सुमारे १६ मूलभूत […]

Continue Reading

श्रीरामनगर पुनर्वसनातील ग्रामस्थांचा थरारक निर्धार! “मागण्या पूर्ण करा… अन्यथा आम्ही आमच्या स्वगावीच राहणार!”

श्रीरामनगर पुनर्वसनातील ग्रामस्थांचा थरारक निर्धार! “मागण्या पूर्ण करा… अन्यथा आम्ही आमच्या स्वगावीच राहणार!” श्रीराम नगर पुनर्वसन – आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी श्रीराम नगर पुनर्वसन येथील संपूर्ण ग्रामस्थांनी आपल्या पुरणगाव कारीमाती – नवलेवाडी – जलकरगोंदी या मूळ गावी पुनःप्रवेश केला आहे. सन 2012-13 मध्ये वनविभागाच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले होते. मात्र पुनर्वसनातील […]

Continue Reading

गोंदिया पोलिसांसमोर ११ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पन 

गोंदिया पोलिसांसमोर ११ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पन  गोंदिया : नक्षलवाद निर्मूलन मोहिमेला गोंदिया पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. महाराष्ट्र–मध्यप्रदेश–छत्तीसगड (एमएमसी) क्राइम कंट्रोल स्पेशल ऑपरेशन अंतर्गत एकूण ११ नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, जनजागृती, विश्वास संपादन अभियानामुळे ही मोठी कारवाई शक्य झाली. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये विविध पथकांतील ACM, तांत्रिक टीम सदस्य, […]

Continue Reading

शासनाच्या उदासीनतेला गावकऱ्यांचा ठाम उत्तर! ४ डिसेंबरला श्रीरामनगरवासीयांचे स्वगावी ‘घरवापसी आंदोलन’

शासनाच्या उदासीनतेला गावकऱ्यांचा ठाम उत्तर! ४ डिसेंबरला श्रीरामनगरवासीयांचे स्वगावी ‘घरवापसी आंदोलन’ सडक अर्जुनी= श्रीरामनगर येथील पुनर्वसित नागरिकांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात मोठा निर्धार करत ४ डिसेंबर २०२५ रोजी कालीमाती, कवलेवाडा, झलकर्गोंदी या मूळ गावी परत जाऊन शेती सुरू करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. पुनर्वसनाला तब्बल १३ वर्षे पूर्ण झाली, पण गावकऱ्यांच्या सुमारे १६ मूलभूत मागण्या आजतागायत अपूर्णच […]

Continue Reading