डुग्गीपार पोलीसांची कारवाई 08 गुम मोबाईलचा शोध घेवून केले त्यांचे मुळ मालकांना परत
सडक अर्जुनी= सदर प्रकरणी हकीकत अशी की, पोलीस स्टेशन डुग्गीपार कार्यक्षेत्रातील इसमांच्या हरविलेल्या मोबाइल बाबत तक्रारी प्राप्त होताच तक्रारींची वेळीच दखल घेवून क्कक्ष्ङ घ्दृद्धद्यठ्ठथ् द्वारे व सायबर सेल, गोंदिया यांचे मदतीने हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला व मिळून आलेले एकुण 08 अॅन्ड्राइड मोबाइल आज रोजी त्यांचे मुळ मालकांना पोलीस स्टेशनला बोलावून परत करण्यात आले. तसेच पो.स्टे. हद्दीतील इसमांचे मोबाइल हरविताच त्याबाबत पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे तक्रार करण्याची जनजागृती करण्यात आली.
सदरची कार्यवाही मा.गोरख भामरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री.अभय डोंगरे सा. अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, श्री.विवेक पाटील सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री.गणेश वनारे पो.स्टे. डुग्गीपार, सपोनि जावेद शेख, पोउपनि नितीन देऊरकर, पोहवा जगदीश मेश्राम, पोहवा आशिष अग्निहोत्री, पोना महेंद्र सोनवाने, पोशि उद्देभान रुखमोडे यांनी केली.

