वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाला वनविभागाकडून 25 लाखांची नुकसानभरपाई

करियर महाराष्ट्र स्वास्थ्य

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाला वनविभागाकडून 25 लाखांची नुकसानभरपाई

सडक अर्जुनी 

माहुली येथे दिनांक 30 जानेवारी रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लक्ष्मी हेमराज सयाम (वय 60 वर्ष) यांच्या कुटुंबाला वनविभागामार्फत 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी कुटुंबाला तातडीची मदत म्हणून 50,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच संबंधित वाघाला जेरबंद करण्यात आले होते. त्यानंतर वनविभागाकडून नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

आज मा. आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत 24 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश मृताच्या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुऱ्हे, माहुलीच्या सरपंच उषाताई मेश्राम, उपसरपंच विशाल पार्वते, पोलिस पाटील पुष्पा कापगते, महेश मेश्राम, सचिन कापगते व मुन्ना कापगते आदी उपस्थित होते.

सदर नुकसानभरपाईची कार्यवाही मा. उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग (गोंदिया) व सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) सचिन डोंगरावर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *