फेसबुकवर बनावट आयडी वरून महापुरुषांची बदनामी! दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार 

अपराध करियर महाराष्ट्र राजनीति शिक्षा

फेसबुकवर बनावट आयडी वरून महापुरुषांची बदनामी!

दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार 

सडक अर्जुनी : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. “दिनेश ब्राम्हणकर” या नावाने फेसबुकवर बनावट आयडी तयार करून महापुरुषांविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक व्हिडिओ आणि फोटो प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 6 मे रोजी डुग्गीपार पोलीस स्थानक येथे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणबी समाजातील एका व्यक्तीच्या नावाचा वापर करून बनावट फेसबुक आयडी तयार करण्यात आला. त्या आयडीवरून महापुरुषांविरोधात आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. या माध्यमातून ओबीसी आणि एससी समाजात वाद व सामाजिक भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे आंबेडकरी व सामाजिक संघटनांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महापुरुषांनी देशात समता, बंधुता, मानवता आणि संविधानिक मूल्यांची शिकवण दिली. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश देत समाजप्रबोधनाचे कार्य केले. अशा महान व्यक्तिमत्त्वांची सोशल मीडियावर बदनामी करून समाजात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार हा वेक्ती सडक अर्जुनी तालुक्यातील असुन तो तेली समाजातील वेक्ती असुन देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असुन त्याला अश्या पोस्ट करण्यासाठी माशीक पागर देखील मिळत असल्याचे सूत्र सांगतात, त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सोशल मीडियाचा वापर करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर सायबर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, 6 मे रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवेळी रोशन बडोले, विदेश टेम्भूर्णे, अश्लेष अंबादे, रुपचंद खोब्रागडे, कुणाल बडोले, राजेश फुले, ओमप्रकाश टेम्भूर्णे, केलास बारसागडे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. संबंधित फेसबुक आयडीची सखोल चौकशी करून खऱ्या सूत्रधाराचा शोध घ्यावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियाच्या वाढत्या गैरवापराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस प्रशासन पुढे कोणती कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *