मोगरा (मोठा) येथे महिलांच्या पुढाकारातून बावला–बावलीचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न
सडक अर्जुनी = तालुक्यातील मोगरा (मोठा) येथे महिलांच्या पुढाकारातून पारंपरिक बावला–बावलीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. गावात यावर्षी एकाही मुला-मुलीचा विवाह समारंभ पार पडला नसल्याने गावातील परंपरेनुसार बावला–बावलीचा विवाह करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
यापूर्वी बावला–बावलीचे विधिवत वाक पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक रितीरिवाज, ढोल-ताशांचा गजर आणि मंगलमय वातावरणात विवाह सोहळा पार पडला. या अनोख्या सांस्कृतिक उपक्रमात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच संपूर्ण ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी डी. यश पटणे, सरपंच लेखलाल टेकाम (ग्रामपंचायत राजगुडा), माजी सरपंच मोहन सूरसाउत्त, सीमा पटणे (सदस्य, ग्रामपंचायत राजगुडा), कैलास वट्टी, सुखराम पटणे, बबन पटणे, पुरुषोत्तम हटवार, हरीश पटणे यांच्यासह मोगरा (मोठा) येथील संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या एकोप्याचे आणि गावच्या लोकपरंपरेचे दर्शन घडविणारा हा विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उपस्थितांनी अशा सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संकल्प व्यक्त करत कार्यक्रमाचे कौतुक केले.

