सडक अर्जुनी येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कार्यालयात भीमजयंती उत्साहात साजरी
सडक अर्जुनी, :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सडक अर्जुनी येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कार्यालयात भीमजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा स्वीकार करून समाज प्रगतीच्या मार्गावर नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष चंद्रमुनी बनसोड, सुशील लाडे, उपाध्यक्ष निलेश शहारे, सचिव मुन्ना ठाकूर, निलेश बोरकर तसेच पत्रकार बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

