डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाम्हणी/खडकी येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

करियर महाराष्ट्र शिक्षा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाम्हणी/खडकी येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

सडक अर्जुनी : ग्रामपंचायत कार्यालय बाम्हनी/खडकी यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून बाम्हणी/खडकी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. विलास वट्टी (सरपंच) माजी उपसभापती पंचायत समिती सडक अर्जुनी विलास शिवणकर यांच्या हस्ते वाचनालयाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपसरपंच विकास खोटेले, ग्रामपंचायत सदस्या ज्योतीताई बोरकर, कल्पनाताई तवाडे, अर्चनाताई चिचाम, रेखाताई शिवणकर, ताराचंदजी कोडापे, नोविन मेश्राम, अनिल मेश्राम, मोहिनी मडावी, ग्रामपंचायत अधिकारी टी. आर. जनबंधू सर, पि.के .सुखदेवे सर, नरेश भेंडारकर,, गुरुदेव खोटेले, वामन गजभिये, मुरलीधर खोटेले, नीताताई बडोले, बिंदियाताई शहारे, शालिनीताई शहारे, ललिताताई चुटे, अनिल कुलभजे, प्रविण तवाडे यांच्यासह गावातील पदाधिकारी व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना व युवकांना अभ्यासासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार असून गावातील शैक्षणिक वातावरणाला चालना मिळणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *