चिखलातून चिमुकल्यांची शाळेकडे कसरत; ग्रामपंचायत निद्रिस्त?

शिक्षा

चिखलातून चिमुकल्यांची शाळेकडे कसरत; ग्रामपंचायत निद्रिस्त?

  वॉर्ड मेंबर गायब

सडक अर्जुनी : तालुक्यातील ब्राम्हणी खडकी येथील मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे व चिखल साचल्याने शाळेचा पहिलाच दिवस विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरला.

१ जुलै रोजी नव्या शैक्षणिक वर्षाची घंटा वाजताच जिल्हा परिषद शाळा, ब्राम्हणी खडकी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत शाळेत जावे लागले. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साचल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठी कसरत करावी लागली.

गावातील मुख्य रस्त्याची ही अवस्था ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून चिखलमुक्त मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ::

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *