अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; मृताची ओळख पटविण्याचे आवाहन

शिक्षा

अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू

डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; मृताची ओळख पटविण्याचे आवाहन

सडक अर्जुनी| दि. 17 जुलै 2026

मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे अप. क्र. 340/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 125(ब) व 106(1) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विजय कोटांगले (बकल क्र. 1394) करीत असून, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. संबंधित व्यक्तीबाबत कोणालाही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माहिती असल्यास त्वरित संपर्क करा :

पोलीस हवालदार विजय कोटांगले (बकल क्र. 1394)

📞 मोबाईल : 915878302

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *