जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सडक अर्जुनीत एल्गार
कोहमारा टी-पॉईंट ते तहसील कार्यालयापर्यंत सर्वपक्षीय मोर्चा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
सडक अर्जुनी | प्रतिनिधी | दि. २४ जुलै २०२६
दिल्ली येथील जंतर-मंतरवर २० जुलै २०२६ रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ शुक्रवार (२४ जुलै) रोजी सडक अर्जुनी येथे सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. दुपारी १ वाजता कोहमारा टी-पॉईंट येथून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातात तिरंगा ध्वज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र आणि निषेध फलक घेऊन विद्यार्थी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान जय भीम जय भीम जय जय जय भीम “जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है”, “दिल्ली पुलिस हाय हाय”, “भारत माता की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
यावेळी वक्त्यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचे संरक्षण करण्याचे आवाहनही करण्यात आले.
या निषेध मोर्चात हजारोच्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा शांततेत पार पडला असून तहसील प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.
कोहमारा टी-पॉईंट येथून तहसील कार्यालयाकडे निघालेल्या सर्वपक्षीय निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झालेले विद्यार्थी, पालक

