वणव्याचा कहर : ब्राह्मणी खडकीतील शेतकऱ्याचे मोठे नुकसान 500 केळीची झाडे जळून खाक

अपराध करियर महाराष्ट्र शिक्षा

वणव्याचा कहर : ब्राह्मणी खडकीतील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

500 केळीची झाडे जळून खाक

सडक अर्जुनी, प्रतिनिधी :

तालुक्यातील बामणी खडकी येथील प्रगतशील शेतकरी मोहन तवाडे यांच्या शेतात जंगलातील वणव्यामुळे भीषण आग लागून केळीचा बगीचा जळून खाक झाला आहे. या आगीत सुमारे 500 केळीची झाडे पूर्णतः नष्ट झाली असून शेतकऱ्याचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवपायली परिसरातील जंगलात लागलेला वणवा हळूहळू पसरत शेतजमिनीकडे आला. मात्र, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर दखल न घेतल्याने आग विझवण्याचे कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत, असा आरोप शेतकरी मोहन तवाडे यांनी केला आहे.

या आगीत केवळ केळीची झाडेच नव्हे, तर सुमारे 1000 मीटर ड्रीप लाईन आणि 1000 मीटर मल्चिंगही जळून खाक झाले. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून तोंडात आलेला घास वणव्याने हिरावून घेतला आहे.

घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित वनविभागावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पीडित शेतकरी मोहन तवाडे यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *