डुग्गीपार पोलिसांची गौतस्करावर कडक कारवाई; 6 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

अपराध महाराष्ट्र शिक्षा

डुग्गीपार पोलिसांची  गोतस्करावर कडक कारवाई; 6 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

सडक अर्जुनी (प्रतिनिधी) : गोंदिया जिल्ह्यातून नागपूरकडे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गवतस्करीवर डुग्गीपार पोलिसांनी कडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सडक अर्जुनी तालुक्यातील धोंडा-पांढरी परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, गोरेगाव-गोंदिया मार्गावरून एक बोलेरो पिकअप वाहन गवतस्करी करत नागपूरच्या दिशेने जात आहे. या खात्रीशीर माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून तपासणी मोहीम सुरू केली.

दरम्यान, बोलेरो पिकअप (क्रमांक MH 40 CD 2793) संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये गवतस्करी होत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहनासह सुमारे 6 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस कर्मचारी जागेश्वर उके, खोटेले, मुळे व महेंद्र चौधरी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या धडक कारवाईमुळे गवतस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास डुग्गीपार पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *