निधन वार्ता
नैनपुर/डुग्गीपार (ता. सडक अर्जुनी)
आज दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.00 वाजेच्या सुमारास येथील रहिवासी श्री. आनंदरावजी तातोबाजी (महाराज) कापगते यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्वभावाने शांत, धार्मिक व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांसह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांचा अंत्यविधी आजच सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत त्यांच्या स्वगावी नैनपुर/डुग्गीपार येथे करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय असा मोठा आप्तपरिवार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

