कोहमारा येथे भीषण अपघात; दोन ट्रेलरची धडक, चालकाचा मृत्यू
सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा परिसरात मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला. नागपूरहून रायपूरकडे जात असलेला ट्रेलर क्रमांक GJ 03 BY 7718 याला मागून येणाऱ्या ट्रेलर क्रमांक CG 07 DD 8841 ने जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की पहिल्या ट्रेलरचा चालक स्टिअरिंगमध्ये अडकून सुमारे दोन तास फसून राहिला. घटनेची माहिती मिळताच कोहमारा येथील सामाजिक कार्यकर्ते महेश डुंभरे, सुखदेवसिंह ठाकूर, दिनेश भांडारकर, शंकर मिस्त्री तसेच स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. सर्वांनी मिळून मोठ्या प्रयत्नांनी चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आले असले तरी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातानंतर महामार्गावर तातडीची मदत वेळेत न मिळाल्यामुळे चालकाचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे. मृतदेह बाहेर काढल्यानंतर ग्रामीण रुग्णालय, सडक अर्जुनी येथे पाठविण्यात आला.
या प्रकरणाची पुढील चौकशी डुग्गीपार पोलीस करीत असून, बातमी लिहेपर्यंत मृत चालकाची ओळख पटलेली नव्ह

