कोहमारा येथे ‘कॉलम ब्रिज’ची मागणी; नागरिकांनि दिले खा:प्रफुल पटेल यांना निवेदन
सडक अर्जुनी : कोहमारा येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील प्रस्तावित ‘कंपॅक्ट ब्रिज’ (बंद पुल) ऐवजी ‘कॉलम ब्रिज’ (खांबांवर आधारित खुला पूल) उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी जोरदारपणे केली आहे. याबाबत नागरिकांच्या वतीने मा. राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या प्रस्तावित असलेला ‘कंपॅक्ट ब्रिज’ हा दोन्ही बाजूंनी बंद स्वरूपाचा असल्याने कोहमारा गावाचे दोन भाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागेल, ज्यामुळे नागरिकांना दैनंदिन हालअपेष्टा सहन कराव्या लागतील.
तसेच, कोहमारा हे गाव मुख्य बाजारपेठ असल्याने बंद पुलामुळे स्थानिक व्यापार आणि आर्थिक घडामोडींवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, सामाजिक दृष्टीनेही गावात विभागणी निर्माण होऊन एकोपा आणि समन्वयावर परिणाम होऊ शकतो, असेही नागरिकांनी नमूद केले आहे.
नागरिकांची प्रमुख मागणी अशी आहे की, राष्ट्रीय महामार्गावर ‘कॉलम ब्रिज’ उभारण्यात यावा, ज्यामुळे वाहतुकीची सुलभता कायम राहील, शहरातील कनेक्टिव्हिटी अबाधित राहील आणि व्यापार-व्यवसायालाही चालना मिळेल.
“याआधीही कोहमारा वासियांना आपल्या सहकार्याची अपेक्षा होती आणि पुन्हा एकदा आपल्या हस्तक्षेपाची गरज आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन प्रस्तावित ‘कंपॅक्ट ब्रिज’ रद्द करून ‘कॉलम ब्रिज’ मंजूर करावा, अशी मागणी कोहमारा येथील मिलन राऊत.ब्रिजेश दीक्षित.जोगेंद्र साखरे.संतोष अग्रवाल.दिनेश मसराम. Nikhil राऊत.संजीव साखरे.सुभाष सिधाम यांनी केली आहे केली आह

