सडक अर्जुनी येथे महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
सडक अर्जुनी येथे जगदीश सिंह शेंगर यांच्या निवासस्थानी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, सडक अर्जुनी यांच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या भक्तीभाव व उत्साहात साजरी करण्यात आली. महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका रजनी परिहार या होत्या. यावेळी उपाध्यक्ष सोनू ठाकूर, पवन गौर तसेच कोहमारा शहराध्यक्ष सुखदेव सिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात लहान चिमुकल्या मुलांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, त्याग व राष्ट्रभक्ती विषयी मार्गदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीश शेंगर, अमोल बेस, प्रिया शेंगर, मयुरी ठाकूर, विरु गौर, पंकज गौर तसेच सडक अर्जुनी शहरातील संपूर्ण राजपूत समाजाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुन्नासिंह ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन जगदीश शेंगर यांनी मानले.

